जिजामाता एकल महिला उद्योजक योजना
ओजल मायक्रो सर्विस फाऊंडेशनचा महिला सक्षमीकरण उपक्रम
योजनेची माहिती
राज्यातील महिला भगिनींच्या आर्थिक, मानसिक, वैचारिक स्वातंत्र्यासाठी तसेच आरोग्य, पोषण व बाल विकासामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ओजल मायक्रो सर्विस फाऊंडेशन (OMSF) मार्फत एकल महिला उद्योजक तसेच सूक्ष्म व लघु उद्योजक सर्व महिला भगिनींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ओजल मायक्रो सर्विस फाऊंडेशन (OMSF) तर्फे सभासद नोंदणी उपक्रम 01/09/2026 पासून सुरू करण्यात आलेला असून 19/11/2026 पर्यंत या उपक्रमांतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील 18 ते 55 वयोगटातील पात्र महिला भगिनींसाठी हा उपक्रम आहे.
₹1,500/-
सभासद नोंदणी शुल्क ₹1,500/- आहे. अर्ज सादरल्यानंतर फाउंडेशनकडून सदस्यत्व व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
5 वर्षांच्या कालावधीकरिता वार्षिक ₹1,500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार हा लाभ आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक दिन, 19 नोव्हेंबर 2027 पासून देण्यात येणार आहे.
तरी या योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
